आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : इस्रायलने राफा शहरातील एका शाळेवर कलेल्या हवाई हल्ल्यात 10 जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा - दक्षिण गाझापट्टीमध्ये संयुक्त राष्ट्र संघातर्फे चालविण्यात येणार्‍या एका शाळेवर इस्रायली सैन्याने रविवारी केलेल्या आणखी एका हवाई हल्ल्यात किमान दहाजण ठार झाले तर तीस जखमी झाले आहेत. दुसरीकडे इस्रायलने गाझा भागातून लष्कराची अंशत: माघार घेतली आहे. एका लढाऊ विमानाच्या साह्याने दक्षिणकडील राफा शहरातील एका शाळेवर क्षेपणास्त्र डागण्यात आले. इस्रायली लष्कर अतिरेक्यांशी सुरू असलेल्या युद्धामुळे भयभीत झालेले शेकडो पॅलेस्टिनी नागरिक या शाळेत आश्रयासाठी राहत आहेत. तिथेच हा हल्ला करण्यात आला. त्यात 30 जण जखमी झाले.

नऊ ठार
राफामधील शाळेवर झालेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 9 जण ठार झाले. त्यामुळे मृतांचा आकडा 1 हजार 712 वर पोहोचला आहे. आतापर्यंतच्या संघर्षात 9 हजार लोक जखमी झाले आहेत. मृतांत 398 मुले व 207 महिला आहेत.

पुढील स्लाइड्मध्ये पाहा हल्ल्यानंतरचे विदारक दृश्य..