आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death Penalty For \'most Stupid\' Indian Killer In UAE

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी दुबईतील \'\'मोस्ट स्टूपीड\' भारतीय प्रेमीला मृत्युदंड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- संयुक्त अरब अमीरात (यूएई) च्या एका कोर्टाने मोलकरीण प्रेयसीची हत्या केल्याच्या आरोपावरून एका भारतीय नागरिकाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. शेजारी राहणार्‍या प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. 40 वर्षीय दोषीला बचाव पक्षाच्या वकीलांनी 'मोस्ट स्टूपीड किलर' म्हणूनही संबोधले होते.

दोषी तीन वर्षांपूर्वी यूएई सरकारमधील एका अधिकार्‍याकडे स्वयंपाकी होता. शेजारी राहणार्‍या मोलकरीणवर त्याचे प्रेम होते. मात्र, मोलकरीण त्याला वारंवार बलात्काराच्या आरोपाखाली फसवण्याची धमकी देत होती. तिने गर्भवती असल्याचा खोटा दावाही केला होता. त्यावरून आरोपीने तिला बेदम मारहाण करून तिची हत्या केली होती.

सुनावणी दरम्यान, बचाव पक्षाचे वकील म्हणाले, दोघांनी एकमेकांसोबत काही काळ घालवला असला तरी आरोपीने तिला केवळ मिठीत घेतले होते. दोघांनी एकदाही शारीरिक संबंध प्रस्तापित केले नव्हते. मात्र, काही दिवसांनंतर मोलकरीणने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. ती गर्भवती असल्याचा खोटा दावाही केला होता.

अबुधाबीजवळील एका बंगल्यात तो राहत होता. कचरा फेकताना त्याची या मोलकरीणसोबत ओळख झाली. ती शेजारी असलेल्या बंगल्यात काम करत होती. काही दिवसांनंतर तिने आरोपीला आपल्या घरी बोलावले होते. तेव्हा तिचा मालक बाहेरगावी गेला होता.

हत्येचे प्रकरण 2010 मधील आहे. आरोपीने प्रेयसी मोलकरीणच्या डोक्यावर दगडाने वार केले. त्यानंतर पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये तिचा मृतदेह टाकून पुरावे नष्ट करण्यासाठी बंगल्याला आगही लावली होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सऊदी अरबमध्ये भारतीय नागरिकाचा शिरच्छेद...