आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death Toll Rises To Five In Lahore Food Street Blast

पाकिस्‍तान: लाहोरमधील बॉम्‍बस्‍फोटात 5 ठार, 46 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- पाकिस्‍तानमधील लाहोर शहरातील वर्दळीच्‍या ओल्‍ड अनारकली रस्‍त्‍यावर झालेल्‍या शक्तिशाली बॉम्‍बस्‍फोटात एका लहान मुलीसहित पाच लोकांचा मृत्‍यू झाला असून 46 लोक जखमी झाले आहेत.

काल रात्री लाहोर येथील प्रसिद्ध फूड स्‍ट्रीट येथे जेव्‍हा बॉम्‍बस्‍फोट झाला तेव्‍हा अनेक लोक आपल्‍या कुटुंबियांबरोबर जेवण करीत होते. ठार झालेल्‍यांमध्‍ये पाच वर्षाच्‍या एका मुलीचा समावेश असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

दोन व्‍यक्‍तींचा घटनास्‍थळीच तर उर्वरित तिघांचा मेयो हॉस्‍पीटलमध्‍ये मृत्‍यू झाला. बुखारा रेस्‍तरॉंबाहेर बॉम्‍ब ठेवण्‍यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. स्‍फोटामुळे खाण्‍यापिण्‍याचे अनेक दुकानांचे नुकसान झाले.