आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओ आश्‍चर्य! अमेरिकेत मृत महिला झाली 13 दिवसांनी जिवंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - पन्नासवर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोकाकुल वातावरणात दफनविधी केला. त्यानंतर तब्बल 13 दिवसांनी तीच महिला जिवंत आढळल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शॅरोलिन जॅक्सन असे त्या महिलेचे नाव आहे. फिलाडेल्फिया वैद्यकीय परीक्षकांनी शॅरोलिनची तपासणी करून तिला मृत घोषित केले आणि मृत्यू प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर 3 ऑगस्ट रोजी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.


20 जुलै रोजी पश्चिम फिलाडेल्फियातील रस्त्यावर एका महिलेचा बेवारस मृतदेह आढळून आला होता. उत्तरीय तपासणीसाठी तो वैद्यकीय परीक्षकांच्या कार्यालयात पाठवण्यात आला होता. जॅक्सनला ओळखणारा एक सामाजिक कार्यकर्ता आणि तिच्या मुलानेही मृत महिलेची छायाचित्रे पाहून ती शॅरोलिन असल्याचे सांगितले. त्यानंतर वैद्यकीय परीक्षकांनी तिच्या मृत्यू प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केली. मृतदेह हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया साक्षीदारांसह पूर्ण करून तिचा मृतदेह जॅक्सन कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. आता शॅरोलिन समजून ज्या महिलेचा मृतदेह पुरण्यात आला ती नेमकी कोण होती, हे तपासण्यासाठी तिचे थडगे खोदण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाने मागितली आहे.