आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Declare RSS As Terrorist Organisation, Petition Filed In American Court

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दहशतवादी गट, अमेरिकी न्यायालयात याचिका दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दहशतवादी गट असून त्याला ‘परदेशी दहशतवादी संघटना ’(एफटीओ) असा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका अमेरिकी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. शीख संघटनेने ही याचिका दाखल केली आहे.

दक्षिण न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने याचिकेवर परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांना नोटीस पाठवली आहे. त्यावर ६० दिवसांत उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सिख्स फॉर जस्टिस (एसएफजे) संघटनेने ही याचिका दाखल केली. देशाला हिंदू राष्ट्र म्हणून परिवर्तित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फॅसिस्ट विचारांचा प्रचार करणारी संघटना आहे. भारतात बहुसंस्कृती आहे.
आणि बहुधर्मीय देश अशी आेळख आहे. संघाने ‘घर वापसी’चा कार्यक्रम राबवल्याचे नुकतेच जगजाहीर झाले आहे. त्यातून संघटनेने ख्रिश्चन तसेच मुस्लिम समुदायातील लोकांना बळजबरीने हिंदू धर्मात आणले, असे एसएफजेने याचिकेत नमूद केले आहे. आरएसएसला विशेष आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना (एसडीजीटी) असा दर्जा देण्यात यावा.

पुढे वाचा काय आहेत आरोप ?