आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Decreasing Pregancy Pain Men Competition In China

प्रसवकळा जाणण्यासाठी चीनमध्ये पुरुषांची स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेकिंग - महिलांना प्रसवकळा सहन करणे किती त्रासदायक असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हा त्रास कसा आणि काय असतो हे पुरुषांना कधीच कळायचे नाही. त्यासाठी स्त्रीचाच जन्म घ्यावा लागतो, असे टोमणे बायका सतत मारत असतात. परंतु यापुढे चीनमधल्या बायकांना तरी असे टोमणे मारता येणार नाहीत. कारण तेथील एका रुग्णालयाने पुरुषांना प्रसवकळा (लेबर पेन) कशा असतात याची अनुभूती देणारी अनोखी सेवा चीनमध्ये जिन शहरात एका रुग्णालयाने पुरुषांसाठी प्रसवकळांचा अनुभव देणारी तांत्रिक सेवा केली आहे.

विशेष बाब म्हणजे आपल्या गर्भवती पत्नीला हा त्रास सहन करताना किती यातना होत असतील हे जाणून घेण्यास चिनी पुरुषही उत्सुक दिसत आहेत. जिन शहरात आयोजित लेबर पेन कॅम्पमध्ये आलेल्या काही पुरुषांनी सांगितले की, स्त्रियांना त्यासाठी होणारा त्रास नेमका काय असतो हे जाणून घेण्याची आमची इच्छा असून त्यासाठी आम्ही हे करत आहोत.इलेक्ट्रॉनिक शॉकच्या माध्यमातून पुरुषांना लेबर पेनच्या दहा वेगवेगळ्या पातळ्यांचा अनुभव दिला जातो. प्रत्येकपातळीत त्रास वाढवत नेला जातो. एखाद्याला सहनशक्तीपेक्षा जास्त त्रास दिला जाणार नाही याचीही काळजी घेतली जाते.