आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defense Secretary Chuck Hagel Unveils Plan To Shrink Military News In Marathi

अमेरिकेत सर्वात मोठी सैन्य कपात; 70 हजार सैन्याची छाटणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेने संरक्षण खर्चात मोठी कपात करण्याची योजना तयार केली आहे. त्यानुसार लष्कराचा आकार दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी असलेल्या सैन्याएवढा करण्यात येणार आहे. अर्थात ते आतापर्यंतचे सर्वात लहान सैन्य असेल. त्याचबरोबर लढाऊ विमानांनादेखील निवृत्ती देण्यात येणार आहे.

संरक्षण मंत्री चक हेगल यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. लवकरच संसदेत हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यात फेरबदलदेखील होऊ शकतो. सध्या जगात संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश म्हणून अमेरिकेची ओळख आहे. परंतु नवीन प्रस्तावामध्ये सैनिकांना लाभदायी योजनेनुसार निवृत्ती दिली जाणार आहे.

सुमारे 70,000 सैनिकांची कपात केली जाणार आहे. सैनिकांची संख्या 5 लाख 20 हजारांहून साडेचार लाखापर्यंत आणली जाणार आहे. 2014 मध्ये 31 अब्ज डॉलर आणि 2015 पर्यंत 45 अब्ज डॉलरची कपात करण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान, भविष्यात आणखी कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे हेगल यांनी स्पष्ट केले आहे.