आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागवला ‘अ‍ॅपल’ फोन, मिळाली दोन सफरचंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑनलाइन खरेदीचा हा जमाना असला तरी ऑस्ट्रेलियन महिलेला मात्र त्याचा विचित्र अनुभव आला. सदर महिलेने अ‍ॅपल कंपनीच्या स्मार्टफोनची ऑर्डर दिली होती,परंतु प्रत्यक्षात तिच्या हाती सफरचंदे आली. ती देखील दोन !
ऑस्ट्रेलियन महिलेने दोन स्मार्टफोनची ऑर्डर दिली होती. त्यासाठी तिने 1200 डॉलर्स देखील दिले होते. मेकडोनाल्ड्सच्या एका रेस्तराँमध्ये तिने स्मार्टफोन्सचे बुकींग केले होते. तेथेच उत्पादनाचे वितरणाचीही सोय आहे. खरेदीनंतर तिच्या हाती काही वेळातच दोन बॉक्स देण्यात आले. हे दोन बॉक्स घेऊन ती घरी पोहचली. ते उत्सुकतेने उघडून पाहिले. तेव्हा त्यात दोन लालबुंद सफरचंद पाहायला मिळाली. सफरचंद बघून ही महिला हादरली. सदर महिलेच्या नाव मात्र कळू शकले नाही. तिच्यासारखाच अनुभव अन्य एका महिलेला देखील आला आहे. ब्रिस्बन पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोणतीही कंपनी आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेते. त्यामुळे उत्पादनाचा बॉक्स हाती आल्यानंतर तो उघडून पाहिला असता तर अशी वेळ आली नसती. तो लगेच जागेवर परत करता आला असता, असे पोलिसांनी सांगितले.