आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Destroy Immediately : Top US Commander Ordered Bin Laden Photos Purge

लादेनच्या मृत्यूनंतरची छायाचित्रे दडवण्‍याचा अमेरिकेचा होता प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिंग्टन - अमेरिकेने अल-कायदाचा प्रमुख ओसामा ब‍िन लादेन याच्या मृत्यूनंतरची छायाचित्रे लपवण्‍याचा प्रयत्न केला होता,असे अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिका-याच्या ई-मेलच्या माध्‍यमातून उघडकीस आले आहे. मे 2011 रोजी लादेनला संपवल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतरची सर्व छायाचित्रे नष्‍ट करण्‍यात आली. अमेरिकेच्या खास ऑपरेशनच्या प्रमुखांनी छायाचित्रे नष्‍ट करण्‍याचे आदेश दिले होते.

सोमवारी (ता.10) माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत कंझर्व्हेटिव्ह ज्युडिशियल ग्रुपने माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत संपादित ई-मेल मिळावले.त्यात अमेरिकेच्या वरिष्‍ठ अधिका-याने ई-मेलद्वारा लादेनच्या मृत्यूनंतरची छायाचित्रे नष्‍ट करण्‍याचा आदेश दिला होता.

लादेनच्या मृत्यूनंतर 13 मे रोजी अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन कमांडचे अ‍ॅडमिरल विलियम मॅकरेवनने कन‍िष्‍ठ सहकार्यांना मेल केला होता. त्यात असे म्हटले होते,की लादेनच्या मृत्यूनंतर काढण्‍यात आलेली सगळी छायाचित्रे ताबडतोब नष्‍ट करावीत.

ओसामाच्या छायाचित्रांसाठी माध्‍यमांकडून सतत होत असलेल्या मागणीमुळे मॅकरेनने छायाचित्रे नष्‍ट करण्‍याचा आदेश दिला होता. पाकिस्तानातील अबोटाबाद येथे 2 मे 2011 रोजी अमेरिकेच्या सैन्यांने ओसामा बिन लादेनला मृत्यूमुखी पाडले.