आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Destroying Islamic State, Obama Demand War Rights

इस्लामिक स्टेटचा नायनाट करू, ओबामा यांची युध्‍द अधिकाराची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या कारवायांना रोखण्यासाठी हवाई हल्ल्यातून यशस्वी प्रयत्न झाले. त्यात संघटनेचे कंबरडे मोडले आहे. त्यांचा नायनाट करणे हाच त्यावरील अंतिम पर्याय ठरेल. म्हणूनच त्यासाठी अगोदर युद्धाचे अधिकार द्या, अशी मागणी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी केली आहे. देशाचे वरिष्ठ सभागृह काँग्रेसने तीन वर्षे हे अधिकार द्यावेत, असे ओबामा यांनी म्हटले आहे.

ही मोहीम वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. कठीण मोहिमांपैकी आहे. त्यात चूक करून चालणार नाही. त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल; परंतु मित्रराष्ट्रांच्या सहकार्याने अतिरेक्यांना पूर्ण पराभूत करू. सध्याच्या परिस्थितीत आयएसचे कंबरडे मोडलेले आहे. ते संपूर्ण पराभूत होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. त्यांच्या दहशतवादी कारवायांना मित्रराष्ट्रांच्या हवाई हल्ल्याने मोठे हादरे दिले आहेत. सिरियात त्यांच्या कारवाया कमी झाल्या आहेत. कोबानी शहरावर ताबा मिळवण्यात म्हणूनच त्यांना यश येऊ शकले नाही.

पुढे वाचा, सदस्यांना पत्र