आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष केनडींसोबत मर्लिन मुनरोचा सेक्स व्हिडिओ !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - मर्लिन मुनरोची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. तिच्या नावानेच संपूर्ण जग तिला ओळखते. मुनरो तिच्या ह्यातीत प्रसिद्ध सेक्स सिम्बॉल आणि आकर्षक महिला म्हणून ओळखली जात होती. तिच्या बद्दल एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. अमेरिकेतील सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्तींची हेरगिरी करणारा प्रसिद्ध हेर फ्रेड ओटाश याने हा खुलासा केला आहे. त्याचा दावा आहे की, मर्लिन मुनरो आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांचा सेक्स व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला होता. वास्तविक हा व्हिडिओ कधीच जगासमोर आला नाही.

अनेकवेळा मुनरोचा फोन टॅप करणा-या ओटाश यांनी दावा केला होता की, त्यांनी मुनरोचा शेवटच्या क्षणाचा आवाज देखील एकला होता. हॉलिवूडची सेलिब्रिटी असलेल्या मुनरोचा 5 ऑगस्ट 1962 रोजी मृत्यू झाला. केवळ 36 व्या वर्षी आत्महत्या करून तिने जगाचा निरोप घेतला होता. मात्र, अनेक लोकांनी तिच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली होती. ही राजकीय हत्या असल्याचा त्यांचा दावा होता. तिला शेवटचा फोन करणारी व्यक्ती दुसरी - तिसरी कोणी नसून केनडी होते.

मुनरोचे संबंध जॉन एफ. केनडी आणि त्यांच्या भावाशी देखील होते. मृत्यूआधी मुनरोने केनडींच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला असल्याचीही तेव्हा चर्चा होती.