आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारींचे शहर डेट्रॉइट दिवाळखोरीतून वाचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्षभरापूर्वी अमेरिकेतील डेट्रॉइटचे रस्ते काळोखात बुडत चालले होते. रस्त्यांवर उजेड राखण्याइतके पैसे महापालिकेकडे नव्हते. गल्ली-बोळ असुरक्षित होते. समस्याग्रस्त शहर अखेर दिवाळखोर घोषित केरण्यात आले. परंतु आता ते १६ महिन्यांच्या वेदना, अपमानातून बाहेर पडत आहे. ७ नोव्हेंबरला शहर दिवाळखोरीतून सावरण्यासाठी करार झाला.
शहरावरील १८ अब्ज डॉलरच्या कर्जावर प्रारंभी काहीच तडजोड होण्याची शक्यता नव्हती. बँकर्सचे अब्जावधी रुपये फेडण्यासाठी पेन्शनर्सना आपल्या पेन्शनमध्ये मोठी कपात करण्यासंबंधी सुचवण्यात आले होते. वस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या व्हॉन गॉग, व्हिसलर, देगा यांसह इतर कलाकारांच्या अमूल्य कृती वाचवण्याबद्दल सुचवण्यात आले.
या घटनाक्रमादरम्यान काही अनाहूत घटना घडल्या. फिशर, फोर्ड यांसारख्या फाउंडेशनसह अनेक खासगी दात्यांनी सामुदायिक विकास संस्था आणि सरकारशी हातमिळवणी करून पुढाकार घेतला. त्यांनी निर्णय घेतला की, कधी काळी अमेरिकेच्या शक्तीचे केंद्र राहिलेल्या शहराचे आणखी पतन होऊ दिले जाणार नाही. शहर वाचवण्यासाठी ८० कोटी डॉलर
देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. अचानक आशेचा किरण दिसू लागला. डेट्रॉइटचे रहिवासी, कर्मचारी आणि कर्ज देणारे समझोत्यासाठी तयार झाले. कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी पेंशनमध्ये पाच ते वीस टक्के कपात स्वीकारली. वित्तीय संस्था महत्त्वपूर्ण संपत्तींसाठी निधी पुरवतील. फेडरल न्यायाधीश स्टीव्हन रोड्स यांनी वित्तीय संस्थांना कमी धनराशीवर समझोता करण्यात राजी केले. अमेरिकेच्या इतिहासात असा समझोता पूर्वी कधी झाला नव्हता.
१९५० च्या दशकात आपल्या शिखरावर मोटारींच्या शहराची लोकसंख्या सध्याच्या सात लाखांपेक्षा दुप्पट होता. सर्व महान साम्राज्यांसारखे डेट्रॉइटच्या पतनाला अनेक कारणे आहेत. नगराचे विस्कळीत व्यवस्थापन, राजकीय भ्रष्टाचार आणि मजुरांच्या समस्यांनी प्श्न वाढले. १९८० नंतर अमेरिकन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये घसरणीमुळे सर्वाधिक परिणाम डेट्रॉइटवर
झाला. बुद्धिमत्ता हद्दपार झाली. मालमत्तेच्या किमती ढासळल्या. विकास दर मंदावला. करांचा आराखडा विस्कळीत झाला.
डेट्रॉइटला आपला खर्च भागवणे जड जाऊ लागले. या दरम्यान वॉल स्ट्रीटने २००५ आणि २००६ मध्ये शहराची १.४ अब्ज डॉलरचे समभाग विकले. अनेक तज्ज्ञांना विश्वास आहे की, त्यात फसवणूक झाली आहे. वित्तीय संकट आल्यावर ८० कोटी डॉलरच्या कर्जाचे प्रकरण उद्भवल्यावर बँकर्सनी पूर्ण राशी परत मागितली.