आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Devid Hedely America's Most Wanted Terrorist Top List

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत टॉपवर डेव्हिड हेडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी आरोपी डेव्हिड हेडलीचे नाव अमेरिकेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत टॉपवर होते. राष्‍ट्रपती बराक ओबामांच्या दहशतवादविरोधी मोहिमेचे सल्लागार जॉन ब्रेनन यांनी त्यांच्या अहवालात हा खुलासा केला आहे.

ब्रेनन यांनी सिनेटच्या गुप्तचर प्रकरणांच्या समितीकडे हा अहवाल सादर केला आहे. ब्रेनन यांना सीआएचे संचालक नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की पाच वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत हेडलीचे नाव टॉपवर होते. हेडलीसोबत अटक करण्यात आलेल्यांपैकी मन्सूर अरबाबसियार, नजीबुल्ला जाजी, फैजल शहजाद व उमर फारूख अब्दुलमुताल्लम यांचा समावेश आहे. पैकी हेडलीला मुंबई हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवून 35 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ब्रेनन यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, जानेवारी 2009 पासून दहशतवादाशी संबंधित 20 पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली.