आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवयानी खोब्रागडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेतील व्हिसा फसवणूक व मोलकरणीला कमी पगार दिल्याच्या आरोपांत अडकलेल्या राजनयिक अधिकारी देवयानी खोब्रागडे नव्याच अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवयानी यांनी सोमवारी एका मुलाखतीत संपूर्ण घटनाक्रम विस्ताराने कथन केला. मार्चनंतर प्रकरण पुढे सरकू शकले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात डायरेक्टर दर्जाच्या अधिकारी देवयानी जानेवारीत मायदेशात परतल्या होत्या. देवयानी यांच्या मुलाखतीवर मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, यासाठी त्यांनी कोणतीही मंजुरी घेतली नव्हती आणि त्यांना ती देण्यातही आली नव्हती. त्यांनी जे काही सांगितले ते त्यांचे व्यक्तिगत मत होते. तथापि, भारत सरकार आपल्या बाजूने काम करत आहे. कायदेशीर प्रकरण असल्याने वेळ लागू शकतो. त्यामुळे धीर धरावा लागेल, असेही प्रवक्ता म्हणाला.