आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिसा खटला रद्द करण्याची देवयानी यांची न्यायालयाला विनंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - व्हिसामध्ये चुकीची माहिती दिल्याचे प्रकरण रद्दबातल ठरवावे, अशी विनंती भारतीय उपवाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांनी शनिवारी न्यायालयाला केली. अमेरिकेने ज्या दिवशी राजनैतिक सवलत दिली, त्याच्या दुसर्‍याच दिवशी ही तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण अमेरिकेच्या न्यायकक्षेत मोडणारे नाही, असा दावा देवयानी यांच्याकडून करण्यात आला आहे.
मॅनहटनचे सरकारी वकील प्रीत बरारा यांच्या अर्जाला उत्तर देताना देवयानी यांचे वकील डॅनियल आश्रेक यांनी हा दावा सादर केला. देवयानी यांची संयुक्त राष्ट्रात बदली झाल्याचे अमेरिकेने मान्य केले होते. त्यामुळे त्यांनी संपूर्ण राजनैतिक सूट देताना त्यांच्यावरील आरोप मागे घेण्यात आले होते असे याचिकेत म्हटले आहे.