आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांनी आज डिजीएमओची बैठक, पाकिस्तानला हवी युनोची ढवळाढवळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी मोहिमा महासंचालकांची तब्बल 14 वर्षांनंतर मंगळवारी पहिल्यांदाच बैठक होत असून या बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्राच्या लष्करी निरीक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आम्हाला दोन्ही देशांत आणखी तणाव नको असल्यामुळे पाकिस्तान अत्यंत सकारात्मक मानसिकतेने या बैठकीला सामोरे जात आहे, असे पाकिस्तानच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने म्हटले आहे. नाव न छापण्याच्या अटीवर हा अधिकारी म्हणाला की, संयुक्त राष्ट्राच्या भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी निरीक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी मागणी पाकिस्तानकडून या बैठकीत लावून धरली जाणार आहे. दोन अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये आणखी तणाव नको म्हणून 2003 मध्ये करण्यात आलेल्या युद्धबंदी कराराच्या अंमलबजावणीचा आग्रहही धरला जाणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या लष्करी निरीक्षकांना भारताने मोकळेपणाने काम करू द्यावे, म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर युद्धबंदीची प्रभावी अंमलबजावणी होईल, असे हा अधिकारी म्हणाला. आम्ही आमच्या बाजूने लष्करी निरीक्षकांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अर्मयाद तपासणीची परवानगी दिली आहे; पण त्यांच्या (भारताच्या) बाजूने तशी ती दिली गेली नाही, असा या अधिकार्‍यांचा आरोप आहे.