आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कादरींची शरीफ यांना २४ तासांची डेडलाइन, आंदोलन चिघळण्याची चिन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- लष्कराचीमध्यस्थी सुरू असली तरी विरोधकांनी नवाझ शरीफ सरकारवरील दबाव आणखी वाढवल्याचे शनिवारी दिसून आले. धर्मगुरू ताहिर-उल-कादरी यांनी राजीनाम्याची मागणी करताना पंतप्रधानांना २४ तासांची डेडलाइन दिली आहे.
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी रात्री कादरी यांची भेट घेतली. कादरी यांनी आपल्या हालचाली काही दिवसांसाठी पुढे ढकलाव्यात, अशी विनंती इम्रान यांच्याकडून करण्यात आली होती.

सरकार विरोधी गटांचा परस्परांतील हा पहिलाच थेट संवाद होता. दोन्ही गटांकडून १४ ऑगस्टपासून आंदोलन सुरू आहे. कादरी यांनी आता शरीफ यांना २४ तासांची डेडलाइन दिली आहे. या काळात शरीफ यांनी पद सोडावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. वास्तविक कादरी यांनी आंदोलन सुरू झाल्यापासून सरकारला अनेक डेडलाइन दिल्या. गेल्या दोन आठवड्यांपासून ते संसद परिसरात निदर्शने करत आहेत. दरम्यान, देशाने ६७ वर्षांत तीन लष्करशहा पाहिले. यातील एक लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनीच १९९९ मध्ये शरीफ सरकार उलथवून सत्ता काबीज केली होती. त्यामुळे सरकार आणि लष्कर यांच्यातील संबंध चांगले राहिल्याचा पाकिस्तानी इतिहास दिसून येत नाही. सध्या सुरू असलेला संघर्षही धोक्याची घंटा असल्याचे जाणकारांना वाटते.
लष्कराला गळ घातली नसल्याचे सरकारचे म्हणणे होते. दुसरीकडे विरोधी पक्षांनीही हा आरोप अमान्य केला होता. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही संसदेत सरकारची भूमिका मांडावी लागली होती.
तेहरिक-ए-इन्साफच्या वतीने काही दिवसांत लाहोरमधील आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. कराची, फैसलाबाद, मुलतान येथेही त्याचे लोण पसरणार असल्याचे संकेत इम्रान खान यांनी शुक्रवारी रात्री समर्थकांशी बोलताना दिले होते.