आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Inviting For Tips To Student Placement At Ranchi Iim

विद्यार्थ्‍यांना प्लेसमेंटच्या टिप्स देण्‍यासाठी आयआयएम रांचीकडून धोनीला आमंत्रण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रांची - महेंद्रसिंह धोनीने केवळ आपल्या टीम इंडियामध्ये स्वत:ची जागा तयार केली नाही, तर इंडिया सिमेंट कंपनीनेही त्याला नुकतेच व्हॉइस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त केले आहे. त्याच्या या यशामुळे प्रभावित होऊन आयआयएम रांचीने विद्यार्थ्यांना प्लेसमेंट टिप्स देण्यासाठी त्याला आमंत्रित केले आहे.

आयआयएम रांचीने फेकिंग न्यूजशी बोलताना सांगितले की, यापूर्वी आम्ही प्रणव मुखर्जींचे पुत्र अभिजित मुखर्जींना बोलवण्यावर विचार करत होतो. अभिजित नुकतेच अर्णव गोस्वामींच्या ग्रुप डिस्कशनमधूनही बचावले आहेत. ते कदाचित ग्रुप डिस्कशनच्या काही टिप्स देऊ शकतील, असे आम्हाला वाटले. त्यानंतर प्रभावी इंटरव्ह्यूच्या टिप्स देण्यासाठी आम्ही परवेज मुशर्रफ यांना बोलवण्याचाही विचार केला, पण व्यवस्थापनाने धोनीलाच सर्वश्रेष्ठ पर्याय म्हणून निवडले. धोनीच्या मार्गदर्शनामुळे विद्योर्थी अनुभव नसलेल्या क्षेत्रातही उत्कृष्ट नोकरी मिळवण्याचे कौशल्य आत्मसात करू शकतील.

fakingnews.com