आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकराची -बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धूम 3’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात पाकिस्तानमधील बॉक्स -फिसचे सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत. सिनेरसिकांमधील या चित्रपटाबाबतची क्रेझ पाहता पाकिस्तानातील मल्टिप्लेक्समध्ये एकाच दिवशी पाच-पाच शो दाखवले जाऊ लागले आहेत.
पाकिस्तानमधील सर्वात मोठे शहर असलेल्या कराचीमध्ये पहिल्याच दिवशी 56 स्क्रीनवर ‘धूम 3’ ने 2 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स -फिसवर जमवलेल्या गल्ल्याचा विक्रम ‘धूम 3’ने सहजच मोडीत काढला. ‘वॉर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 कोटी 14 लाखांचा गल्ला जमवला होता. ‘धूम 3’ने तो सहजपणे मोडीत काढला, असे पाकिस्तानमधील आघाडीचे वितरक नदीम मांडवीवाला यांनी म्हटले आहे. बेकायदेशीररीत्या आयात केलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्याचा आदेश लाहोर उच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय चित्रपटांच्या पाकिस्तानमधील प्रदर्शनावर अनिश्चिततेचे ढग घोंगावू लागले असतानाच ‘धूम 3’ पाकिस्तानात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची पाकिस्तानात एवढी क्रेझ आहे की, मल्टिप्लेक्समध्ये सर्वच स्क्रीनवर ‘धूम 3’ दाखवला जात आहे. आमिर खानविषयी असलेली प्रचंड क्रेझ मुख्य कारण असल्याचे मांडवीवाला म्हणाले. ‘वॉर’ चित्रपट ईदच्या सुट्यांमध्ये प्रदर्शित झाला होता, तर ‘धूम 3’ सामान्य आठवड्यात प्रदर्शित झाला आहे, हा दोन्हीमध्ये फरक आहे, असे काप्री सिनेमाचे व्यवस्थापक अब्दुल हक म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.