आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्याभिषेकाची साठी, 62 तोफांची शाही सलामी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्याभिषेकाला सोमवारी 60 वर्षे पूर्ण झाली. त्या सन्मानार्थ लंडन टॉवरच्या पार्श्वभूमीवर ग्रीन पार्कमध्ये ब्रिटिश लष्कराच्या ऑनरेबल आर्टिलरी कंपनी, किंग्ज ट्रप रॉयल हॉर्स आर्टिलरी आणि औपचारिक सलामी दलाच्या जवानांनी 62 तोफांची शाही सलामी दिली तेव्हा लंडन टॉवर क्षणभर तोफगोळ्यांच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे जाणवले. महाराणी एलिझाबेथ सध्या 87 वर्षांच्या आहेत.

अनेकांनी विकत घेतले होते टीव्ही
2 जून 1953 रोजी होणारा महाराणीचा राज्याभिषेक सोहळा घरी बसूनच पाहता यावा म्हणून अनेक ब्रिटिशांनी पहिल्यांदाच टीव्ही विकत घेतला होता. लक्षावधी ब्रिटिशांनी टीव्ही व रेडिओवरून या सोहळ्याचा आनंद घेतला होता.