आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिर्‍याने संगणकाची क्षमता, वेग वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - हिर्‍याच्या तारेमुळे माहितीचे दळणवळण अधिक वेगाने करणे शक्य होऊ शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. अशा प्रकारचा हा जगातील पहिलाच दावा आहे. त्यामुळे संगणकाची क्षमता प्रचंड वाढेल. त्याचबरोबर त्याचा वेगही पूर्वीपेक्षा कित्येक पटीने जास्त होईल.

वास्तविक इलेक्ट्रॉन्स हे हिर्‍यातून वाहून जाऊ शकत नाहीत. ते केवळ इलेक्ट्रॉनिक्समध्ये शक्य होऊ शकते. परंतु ते एकाच ठिकाणी राहून चुंबकीय परिणाम पाठवण्याची क्षमता हिर्‍याच्या घटकांत असते. एक कण दुसर्‍या कणाकडे हे तरंग पाठवू शकतो. त्याला शास्त्रीय परिभाषेत स्पीन अशी संज्ञा आहे. अशा कणांची तार बनवून तरंगाचे वहन करणे शक्य होणार आहे. तरंगाच्या वहनाचा वेग हा पूर्वीच्या इलेक्ट्रॉनिक्सपेक्षा अनेक पटीने अधिक असेल, असे प्रयोगात दिसून आले आहे. या प्रयोगावर अजूनही अभ्यास सुरू आहे. एक दिवस अशा प्रकारच्या स्पीनमधून डाटा पाठवणे शक्य होईल, असा विश्वास संशोधकांना वाटतो.

तारेचे वैशिष्ट्य काय ?
कठीणता, पारदर्शकता, इलेक्ट्रिकपेक्षा अधिक वेगवान, पर्यावरणातील प्रदूषण टाळणारी.

खूप फायदेशीर
हिर्‍याच्या तारेपासून डाटा वहनाची क्षमता असलेले तंत्र संगणक क्षेत्रात क्रांतिकारक ठरणार आहे. त्यामुळे ते फायदेशीर ठरणार आहे. -ख्रिस हॅमेल, संशोधक

कोणी केला प्रयोग ?
ओहिओ स्टेट विद्यापीठात हा प्रयोग करण्यात आला. धातूपेक्षा स्पीन हे साधन अधिक चांगले असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. जगभरातील अनेक संशोधकदेखील अधिक वेगवान संगणकाच्या निर्मितीच्या प्रयोगात व्यग्र आहेत. संशोधक ख्रिस हॅमेल यांच्या नेतृत्वाखालील टीमने एका लहान तारेवर हा प्रयोग केला. नायट्रोजन अणुंना या तारेतून पाठवण्यात आले.