आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : अमेरिकेला नाकी नऊ आणणारा हुकूमशहा राहत होता आलिशान बंगल्‍यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: सद्दाम हुसैनचा अल-फॉ पॅलेस
इराक चा हुकूमशहा सद्दाम हूसेन याने आपल्‍या 24 वर्षांच्‍या कार्यकाळात 80 ते 100 महल बांधले. इरामधील सर्वच प्रमुख शहरामध्‍ये त्‍याचे महल होते. त्‍या महलात सद्दामच्‍या पत्‍नी, मित्र आणि प्रेयसी राहत होत्‍या.
संयुक्त राष्ट्र संघाच्‍या अहवालानुसार, सद्दाम हुसेनच्‍या प्रमुख आठ बंगल्‍यांच्‍या कंपाउंडमध्‍ये एक हजारहून अधिक इमारती आहेत. यामध्‍ये लग्‍झरी मेंशन, बंगले, ऑफिस कॉम्प्लेक्सेस, वेयरहाउस आणि गॅरेज यांचा समावेश आहे. कम्पाउंडचा संपूर्ण परिसर 32 चौरस किलोमीटर आहे. त्‍यातील आर्किटेक्चर अप्रतिम आहे.
(इराक चे पूर्व राष्ट्राध्‍यक्ष हुकूमशहा सद्दाम हुसैन यांना 5 नोव्‍हेबर रोजी फाशीची शिक्षा दिल्‍या गेली.)
दोन दशकांपर्यंत इराकचे राष्‍ट्राध्‍यक्ष असलेल्या सद्दाम हुसेन यांचा जन्म 1937 मध्‍ये बगदादच्या उत्तरेला असलेल्या तिकरितमध्‍ये झाला. सद्दाम यांनी 1980 मध्‍ये नव्या इस्लामिक क्रांतीचा प्रभाव कमी करण्‍यासाठी इराणच्या पश्चिमकडील सीमेलगत आपली सेना उतरवली होती. यामुळे आठ वर्षे चाललेल्या युध्‍दात लाखो लोकांना जीव गमवावे लागले. या दरम्यान जुलै 1982 मध्‍ये सद्दाम यांच्यावर आत्मघाती हल्ला झाला. यानंतर त्यांनी शिया बहुल दुजैल गावातील 148 लोकांची हत्या घडवून आणली होती.
सद्दामच्‍या अंतानंतर 2003 मध्‍ये त्‍याच्‍या काही बंगल्‍यांवर अमेरिकन सैन्‍याने, इराकी नागरिकांनी कब्‍जा केला होता. आता ही सर्व बंगले इराक शासनाच्‍या ताब्‍यात असून त्‍यातील काहींना पर्यटन स्‍थळम्‍हणूनही घोषित केले आहे.
पुढील सलाइडवर पाहा, सद्दाम हुसैनच्‍या बंगल्‍यांची छायाचित्रे..