आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिल चीज क्या है’वर वान्याने प्रेक्षकांना जिंकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजींग- मिस वर्ल्ड 2012 चा प्रतिष्ठेचा किताब भारताच्या हातून थोडक्यात निसटला. पण ‘दिल चीज क्या है’या गाण्यावर वान्या मिश्राने केलेले नृत्य जगभरातील रसिक प्रेक्षकांना भुरळ पाडून गेले. 116 देशांमधील चीनी रुपगर्विता वेन झिया यू हिने यंदाचा मिस वर्ल्डचा किताब पटकावला.
चिनी सौंदर्यवतीला हा बहुमान मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. दोंगशेंग फिटनेस सेंटर स्टेडियमवर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात गतवेळची विजेती व्हेनेझुएलाची इव्हियान सार्कोस हिने मिस वर्ल्डचा मुकुट वेनच्या डोक्यावर ठेवला. 23 वर्षीय वेन संगीताची विद्यार्थिनी असून संगीत शिक्षिका होण्याची तिची इच्छा आहे. वेल्सची सोफी मौल्दस ही प्रथम उपविजेती ठरली तर ऑस्ट्रेलियाची जेसिका कहावटीने उपविजेतेपदाचा मान मिळवला.
वान्याच्या नृत्यावर फिदा : भारताची वान्या मिश्रा किताबाची प्रवळ दावेदार होती. तिला ‘मिस सोशल मिडीया’ आणि ‘ब्युटी विथ पर्पज’असे दोन पुरस्कार मिळाले. मात्र उपांत्य फेरीत उमरावजान चित्रपटातील ‘दिल चीज क्या है’गाण्यावर तिने सादर केलेल्या अप्रतिम नृत्यांमुळेच तिची पहिल्या सात सौंदर्यवतींमध्ये निवड झाली.तिचा पदन्यास पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
अंतिम फेरीत वान्याचे उत्तर : पुढील मिस वर्ल्ड होण्याची काय योग्यता तुमच्यापाशी आहे असा प्रश्न अंतिम फेरीत परीक्षकांनी केला होता.त्यावर वान्या म्हणाली, नवी मिस वर्ल्ड ही आत्मविश्वास असलेली विनम्र आणि दयाळू असावी.तिला पाहताच ही लोकांना आपलेपणाची जाणीव व्हावी.गुंतागुंतीच्या या जगात जगण्यासाठी तिची मुल्ये अत्यंत साधी सरळ असावीत.
कोण आहे वान्या मिश्रा- वान्या मिश्रा मूळची पंजाबची आहे. 20 फेब्रुवारी 1992 मध्ये जन्मलेली वान्या पीइसी विद्यापीठात इलेक्ट्रिक इंजिनियरिंगचा पदवी अभ्यासक्रम करत आहे. 30 मार्च 2012 मध्ये फेमिना मिस वर्ल्ड हा किताव मिळवल्यानंतर ती या स्पर्धेसाठी पात्र ठरली होती.
भारताला 5 वेळा किताब- रिटा फारिया (1966), ऐश्वर्या रॉय (1994), डायना हेडन (1997), युक्ता मुखी (1999) प्रियांका चोप्रा (2000) .
मिस वर्ल्डचा इतिहास- मिस वर्ल्ड स्पर्धेचे पहिल्यांदा 1951 मध्ये आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा एरिक मोर्ली यांनी सुरू केली होती. पहिला किताब स्वीडनच्या क्रिस्टीन हाकोनसनला मिळाला होता. मागील वर्षी व्हेनेझुएलाची इव्हिएन सारकोसने ही स्पर्धा जिंकली होती.