आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया : कडक कायद्यांची अंमलबजावणीचे श्रेय दिमित्री मेदवेदेवना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियात भ्रष्टाचारविरोधी कडक कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे श्रेय मेदवेदेव यांच्याकडे जाते. दिमित्री मेदवेदेव यांनी लेनिनग्रेड विद्यापीठातून 1987 मध्ये कायद्याची पदवी संपादन केली. सेंट पिट्सबर्ग विद्यापीठात त्यांनी 1999 पर्यंत नागरी आणि रोमन कायद्याचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. सेंट पिट्सबर्गचे महापौर अ‍ॅनाटोली सोबचाक यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे व्यवस्थापक आणि नंतर सल्लागाराच्या रूपाने त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. याच काळात त्यांची व्लादिमीर पुतीन यांच्याशी मैत्री झाली. 1999 मध्ये रशियाच्या अध्यक्षीय प्रशासनाने त्यांची डेप्युटी चीफ ऑफ स्टाफपदी नियुक्ती केली. 2000 मध्ये झालेल्या रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते पुतीन यांचे प्रचार व्यवस्थापक होते. 2005 मध्ये त्यांची रशियाच्या पहिल्या उपपंतप्रधानपदी नियुक्ती झाली. त्यांच्यावर राष्ट्रीयदृष्ट्या प्राधान्यक्रमाच्या प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली. 2007 मध्ये युनायटेड रशिया या पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आली. 2008 मध्ये झालेली अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी 70.28 टक्के मते मिळवून जिंकली. मात्र त्यांनी दुस-या टर्मसाठी निवडणूक लढवली नाही. त्यामुळे पुतीन यांनी 2012ची अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. रशियाची अर्थव्यवस्था आणि समाजाचे आधुनिकीकरण आणि तेल व गॅस क्षेत्रात रशियाला स्वावलंबी बनवण्याचे काम मेदवेदेव यांनी अध्यक्षीय कारकिर्दीत केले. 2000 च्या आर्थिक मंदीतून रशियाला बाहेर काढण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.