आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीच्या खलाशाची आई म्हणते, मच्छीमारांच्या हत्या प्रकरणात न्याय झाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम - भारतीय मच्छीमारांच्या हत्या प्रकरणात तर न्याय केव्हाच झाला. आता सर्व काही ठिक आहे, असे आरोपी खलाशांपैकी एकाच्या आईने म्हटले आहे. मस्सीमिलीआनो लाटोरी आणि सॅल्व्हाटोर गिरोन अशी इटालियन खलाशांची नावे आहेत. पॅरोलवर गेलेले हे आरोपी भारतात पुन्हा परतलेले नाहीत. मस्सीमिलीआनोच्या आईने आता सर्व काही ठिक आहे, असे म्हटले आहे. माझा मुलगा सैनिक आहे. तो भारताविषयी मैत्रीभाव ठेवतो. आमची मुले आता पुन्हा मातृभूमीच्या सेवेसाठी स्वतंत्र आहेत. न्याय झाला आहे.