आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disaster struck Malaysia Airlines To Change Name

मलेशियन एअरलाइन्स नाव बदलणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - जगभरात खळबळ माजवणार्‍या दोन घटनांनंतर मलेशियन एअरलाइन्सला आपली प्रतिमा बदलणे भाग पडत आहे. एअरलाइन्स प्रशासन नावासह हवाई मार्गातही बदल करण्यावर विचार करत आहे. एअरलाइन्सचे व्यावसायिक संचालक हग डनलेव्ही यांनी एका मुलाखतीत बदलत्या धोरणाची माहिती दिली.

मार्च महिन्यात क्वालालंपूरहून बीजिंगला जाणारे एमएच 370 हे विमान उड्डाणानंतर तासाभरातच गायब झाले. यात 239 प्रवासी होते. विमान भारताच्या दक्षिणेकडील सागरात कोसळल्याचे मानले जात आहे. त्यानंतर याच महिन्यात घडलेल्या अन्य एका घटनेत, अ‍ॅमस्टरडॅमहून क्वालालंपूरला जाणारे बोइंग 777 हे विमान युक्रेनमधील डोनेस्क परिसरात क्षेपणास्त्र हल्ल्यात पाडण्यात आले. यातील सर्व 298 प्रवाशांचा मृत्यू झाला. दोन दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर, मलेशियन एअरलाइन्सतर्फे प्रतिमा बदलण्यासाठी काही धोरणात्मक बदल करण्यात येणार आहेत. तसेच व्यवसायवृद्धीसाठी गुंतवणुकीचे इतर पर्यायही पडताळून पाहिले जाणार आहेत. एअरलाइन्समध्ये सर्वाधिक वाटा असलेल्या मलेशियन सरकारने बदलाची प्रक्रिया सुरू केली आहे.