आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Discussion With India On The Srilankan Issue : Black

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीलंका मुद्द्यावर भारताशी विचारविनिमय : ब्लेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - संयुक्त राष्‍ट्रच्या मानवी हक्क आयोगात श्रीलंकेविरुद्ध प्रस्ताव दाखल करण्याच्या प्रक्रियेत भारताशी विचारविनिमय केला होता, असा दावा अमेरिकेचे दक्षिण व मध्य आशिया विभागाचे उपमंत्री रॉबर्ट ब्लेक यांनी केला आहे. भारताने सुचवलेल्या दुरुस्त्या स्वीकारल्या आहेत. या क्षेत्रातील प्रभाव पाहता आंतरराष्‍ट्रीय समुदायाने या मुद्द्यावर भारतासोबत काम करणे आवश्यक असल्याचे ब्लेक यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अमेरिका श्रीलंकेत फूट पाडत असल्याच्या आरोपाबद्दल ब्लेक म्हणाले, श्रीलंकेला एकत्र आणण्याचे प्रयत्न आहेत. शिवाय त्याचबरोबर युद्ध गुन्हेगारांविरुद्ध चौकशी सुरू राहील.