आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Disney Theme Parks Are Dream Destination, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DREAM DESTINATION : हे आहेत जगभरातील 5 प्रसिद्ध थीम पार्कस्

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डिज्नीलँड रिसॉर्ट, कॅलिफोर्निया)

डिज्नी चॅनल द्वारा आयोजित केला जाणारा ऑन एयर कॉन्टेस्ट 'जेट-सेट गो-3' समाप्त झाला आहे. या कॉन्टेस्टमध्ये जिंकणार्‍या कुटूंबाना डिज्नीलँड फिरण्याची संधी मिळणार आहे. डिज्नी चॅनलने 2012 मध्ये जेट एयरवेजसोबत भागिदारी करत ऑन एयर कॉन्टेस्ट 'जेट-सेट गो' सुरू केला होता.

'जेट-सेट गो' चे तिसरे पर्व संपले आहे. देशभरातून पाच कुटूंब विजेती ठरली आहेत. ही पाच कुटूंब डिज्नीचे पाचही पार्क पाहायला जाणार आहेत. हे पार्क जगभरात प्रसिद्ध आहेत. येथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यांना आपल्या आवडत्या कार्टून डिज्नीलाही भेटायची संधी मिळते.

किड्स चॅनलचे दिग्दर्शक , विक्रम दुग्गल यांनी सांगितले की, कॉन्टेस्टचे उद्देश्य मुलांना कार्टून कॅरेक्टर्सना भेटवणे हे आहे. जेट सेट गो-3 विजेता कृष्णकांत यांनी सांगितले की ते डिज्नीलँडला जाण्यास उत्सूक आहेत.

मुलांच्या मनोरंजनासाठी जगभरात डिज्नीचे चार ड्रीम पार्क आणि एक डिज्नी क्रूका लाइन आहे. दरवर्षी जगभरातून अनेक लोक या पाच डिज्नीलँडमध्ये फिरायला येतात. येथे रिसॉर्ट, हॉटेल, डायनिंग, खरेदीसोबतच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बर्‍याच गोष्टी आहेत. जाणून घ्या...

डिज्नीलँड रिसॉर्ट, कॅलिफोर्निया
हे डिज्नीलँडच्या नावाने प्रचलित आहे. येथे दोन थीम पार्क, तीन हॉटेल, शॉपिंग, डायनिंग आणि एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्स आहे, ज्याला डाउनटाउन डिज्नी म्हणतात. वॉल्ट डिज्नीने या पार्कला 1950 मध्ये बनवायला सुरूवात केली होती. 7 जुलै, 1955 ला हे लोकांसाठी खुले करण्यात आले होते.

पुढच्या स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर 4 चार ड्रीम पार्कबद्दल...