आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉस एजेंल्स - 'वॉल्ट डिस्ने'या लोकप्रिय कार्टून नेटवर्कने त्यांच्या वाहिनीवर मुलांच्या कार्यक्रमामध्ये जंकफुडच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना आरोग्यदायी खानपानाच्या सवयी लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
जंकफुडच्या जाहिरातींवर बंदी घालणारे डिस्ने हे पहिले चॅनल असल्याचे 'द लॉस एजेंल्स टाईम्स'ने म्हटले आहे.
२०१५ पासून डिस्नेवर जंकफुडच्या जाहिराती दिसणार नाहीत. तोपर्यंत जाहिरातदारांशी करार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
डिस्ने हे मुलांचे आवडते चॅनल आहे. शाळेतून घरी आल्यानंतर बहुतेक शहरातील मुले हे टीव्हीच्या स्क्रिनला डोळे लावून बसतात. साहाजिकच जाहिरात कंपन्याही मुलांना केंद्रस्थानी ठेवूनच विविध उत्पादनांच्या जाहिराती तयार करतात. त्यामुळे मुले देखील चॅनल्सवर पाहिलेल्या पदार्थांची मागणी करतात. हे खाद्यपदार्थ आरोग्याला किती उपयोगी आहेत किंवा हानीकारक आहेत, याचा विचार न करता पालकही मुलांच्या हट्टाला बळी पडतात. यामुळे मुलांच्या खानपानाच्या सवयी बिघडत असल्याची जाणीव ठेवून डिस्नेने अत्यंत स्तूत्य निर्णय घेतला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
डिस्नेचे अध्यक्ष रॉबर्ट लेगर म्हणाले, आम्ही अजूनही पुढचे पाऊल उचलणार आहोत. आम्ही खाद्य पदार्थांच्या जाहिरातींचे नवे मानांकनच यापुढे तयार करणार आहोत.
चुकीच्या खाद्यसंस्कृतीमुळे अमेरिकेतील जवळजवळ एक तृतीयंश मुलांना जाड(ओव्हरवेट) होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. एका संशोधनानुसार, तरुणांमध्येही मधुमेह आणि तत्सम आजारांचा सामना करावा लागत आहे.
खोडकर पात्र मिकीचा जनक वॉल्ट डिस्ने
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.