आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद शर्मा यांच्या नावावरून युनोत गोंधळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्‍ट्रे - संयुक्त राष्‍ट्राच्या प्रसारमाध्यम विभागाने केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांच्या नावावरून गोंधळ उडवून दिला. संयुक्त राष्‍ट्राचे सरचिटणीस बान की मून यांच्यासोबत वाणिज्य मंत्री कमलनाथ यांचे फोटो सेशन होत असल्याचा निरोप प्रसारमाध्यम प्रतिनिधींना पाठवण्यात आला.

मात्र, कमल नाथ दौ-यावर नसल्याची माहिती भारतीय अमेरिकी माध्यम प्रतिनिधींना होती. त्यांनी शर्मा यांच्या नावावरून झालेली चूक लक्षात आणून दिल्यानंतर संयुक्त राष्‍ट्राने सारवासारव केली. आनंद शर्मा चार दिवसांच्या अमेरिका दौ-यावर आले आहेत.कमलनाथ हे माजी वाणिज्य मंत्री असून सध्या त्यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्रिपदाचा कार्यभार आहे.