Home | International | China | divorse ratio increse in china

चीनमध्ये घटस्फोटांची समस्या वाढली; लिंग गुणोत्तरात तफावत

agency | Update - Jun 08, 2011, 02:11 PM IST

शीर्षक वाचून आश्चर्य वाटेल; परंतु हे खरे आहे. चीनमध्ये रोज सुमारे पाच हजार घटस्फोट होतात.

  • divorse ratio increse in china

    बीजिंग - शीर्षक वाचून आश्चर्य वाटेल; परंतु हे खरे आहे. चीनमध्ये रोज सुमारे पाच हजार घटस्फोट होतात. स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाणातील प्रचंड तफावत व बदलते सामाजिक संदर्भ यातून चीनमध्ये ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत ही आकडेवारी लाखोंच्या घरात आहे. एका अभ्यासावरून चीनमध्ये रोज 5 हजार लोक काडीमोड घेतात. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी घटस्फोट घेणार्‍यांच्या संख्येत 17 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. विवाहावरून चिनी समाजात अनिश्चिततेचे वातावरण असल्याचे येथील सामाजिक विज्ञान अकादमीचे तज्ज्ञ चेन यिजून यांचे म्हणणे आहे.

Trending