आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयफोनमधून युजर डाटा काढणे शक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅनफ्रान्सिस्को - आयफोनमध्ये असलेली संपर्क यादी, संदेश आणि फोटोपर्यंत कंपनी सहज पोचू शकते. याबद्दल युजरला कसलीही खबर नसते. सुरक्षेसंबंधीचे तज्ज्ञ जोनाथन जियारस्कीने गेल्या आठवड्यात हॅकर्स परिषदेत ही माहिती दिली. हॅकर्स परिषदेतील माहितीनंतर अ‍ॅपलने युजरच्या प्रत्येक डाटापर्यंत पोचण्याचे तंत्र आपल्याकडे उपलब्ध असल्याचे कंपनीने स्वीकारले आहे. जोनाथन यांच्या मते युजरला याबद्दलची माहिती दिली जात नाही. त्याचबरोबर युजर यासंबंधीची सेवादेखील बंद करू शकत नाहीत. अ‍ॅपल आणि अमेरिकेची हेरगिरी करणारी एनएसए यांच्यात साटेलोट असावे, असा दावाही जोनाथन यांनी केला आहे. अ‍ॅपलने मात्र एनएसएसोबत असलेल्या संबंधांना फेटाळून लावले आहे. हे तंत्र म्हणजे कंपनीच्या सेवेचाच एक भाग असल्याचे अ‍ॅपलचे म्हणणे आहे. त्याचा उद्देश हेरगिरी करणे नाही. अशा प्रकारची माहिती पुरवत नसल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला.