आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diwali Festival In White House Michal Obama Dance

बॉलिवूडच्या ठेक्यावर मिशेल यांचे नृत्य;व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी उत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा बुधवारी बॉलीवूडच्या तालावर थिरकल्या. तीन वर्षांपूर्वी मुंबईत त्यांनी हिंदी गाण्यावर तालबद्ध नृत्याचा आनंद घेतला होता. त्याची आठवण जागवून मिशेल यांनी पुन्हा एकदा नृत्यामध्ये सहभागी होत ठेका धरला होता.

निमित्त होते व्हाइट हाऊसवरील दीपावली उत्सवाचे. मिशेल यांच्या नेतृत्वाखाली यंदा हा उत्सव साजरा झाला. 2009 मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पहिल्यांदाच प्रकाश उत्सव आयोजित केला होता.

दिवाळीच्या निमित्ताने देशभरातील भारतीय-अमेरिकी नागरिक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. जगातील सर्वात प्राचीन अशा धर्माचे लोक हा उत्सव साजरा करतात.

केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगभरात तो असाच उत्साहाने साजरा केला जातो. भारत दौर्‍यावर असताना माझे पती आणि मला त्याचे महत्त्व कळले. एकत्र येण्याचा ही परंपरा आहे, असे मिशेल या वेळी बोलताना म्हणाल्या.

ईस्ट रूममध्ये धमाल !
व्हाइट हाऊसच्या ईस्ट रूममध्ये मिशेल यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलांसमवेत प्रसिद्ध हिंदी गाण्यांवर नृत्य केले. हॉलमध्ये पहिल्या रांगेत बसलेल्या मुलांना मिशेल यांनी बोलावून त्यांच्यासोबत ठेका धरला होता. सहभागी चिमुकल्यांनीदेखील त्यांच्यासोबत चांगलीच धमाल केली. ग्लॅमरस स्कर्ट परिधान केलेल्या मिशेल सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. त्यांचा हा स्कर्ट भारतीय वंशाचे प्रसिद्ध डिझायनर नईम खान यांनी तयार केला होता.