आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे संशोधन: वैवाहिक जीवनातील समाधाना कर‍िता मानवी डीएनएची भूमिका महत्त्वाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - वैवाहिक जीवनात आनंद किंवा औदासीन्य मिळू शकते! एखाद्याचे वैवाहिक जीवन आनंदाने ओतप्रोत भरायचे की पावलोपावली नुसते वादविवाद आणि तंटेबखेड्यांनीच हैराण करून सोडायचे हे निश्चित करण्यात मानवी डीएनएची भूमिका महत्त्वाची असल्याचे एका नव्या अध्ययनात म्हटले आहे.
सेरोटोनिनचे नियमन करणारे मानवी जनुक आपल्या भावनांमुळे आपल्या नातेसंबंधांवर कोणते परिणाम होऊ शकतात, याचा अंदाज बांधू शकते. जनुके, भावना आणि वैवाहिक समाधानाचा परस्परांशी संबंध जोडून करण्यात आलेले हे अशा प्रकारचे पहिलेच अध्ययन आहे. ‘पती-पत्नीमध्ये वैवाहिक जीवनात कशामुळे भावनिक ओलावा निर्माण होतो आणि नेमका कशामुळे त्यात रुक्षपणा येतो?’ हे अनादी काळापासून रहस्यच राहिले आहे, असे बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट डब्ल्यू. लेव्हिनसन यांनी म्हटले आहे.
संशोधकांना काय आढळले?
नातेसंबंधांची पूर्तता व एक जनुकाची भिन्नता किंवा 5- एचटीटीएलपीआर नावाने ओळखले जाणारे ‘अ‍ॅलिल’ यांच्यात संबंध असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. प्रत्येक मानवाला त्याच्या पालकांकडून या प्रकारचे जीन मिळालेले असते, असे संशोधकांना आढळले.
०दोन आखूड 5 एचटीटीएलपीआर
अ‍ॅलिल असलेल्या जोडप्यात नकारात्मक भावना असते तेव्हा प्रचंड दु:खी, तर हास्य आणि प्रेमासारख्या सकारात्मक भावना असतात तेव्हा प्रचंड आनंदी असतात.
० याउलट एक किंवा दोन लांब अ‍ॅलिल असलेल्या जोडप्यांच्या जीवनावर भावनिक संभाषणाचा फरक पडत नाही. याचा अर्थ विविध प्रकारच्या 5 एचटीटीएलपीआर अ‍ॅलिल असलेली जोडपी अनुरूप नाहीत, असा नसल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.
० दोन आखूड 5 एचटीटीएलपीआर अ‍ॅलिल असलेली जोडपी चांगल्या नातेसंबंधात यशस्वी होण्याची आणि वाईट नातेसंबंधात अपयशी ठरण्याची शक्यता असते.
सर्वकाही भावनिकतेवर अवलंबून
वैवाहिक जीवनातील समाधान किंवा नैराश्य सकारात्मक आणि नकारात्मक भावनिक वातावरणावरच अवलंबून असते. दोन आखूड अ‍ॅलिल असलेल्या जोडप्याचे वैवाहिक जीवन जेव्हा सकारात्मक भावना असतात, तेव्हा उमललेल्या फुलाप्रमाणे असते आणि भावनिक वातावरण नकारात्मक असल्यास सुकलेल्या फुलासारखे असते.’’
क्लाउडिया एम. हॅस्से, मानव विकास प्राध्यापक
अ‍ॅलिलच्या लांबीवर संवेदनशीलतेची तीव्रता
एक किंवा दोन लांब अ‍ॅलिल असलेली माणसे भावनिक वातावरणाबाबत कमी संवेदनशील असतात. त्यांच्यावर सकारात्मक किंवा नकारात्मकतेचा फारसा परिणाम होत नाही.