आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्दीष्‍टावर लक्ष केंद्रित करण्‍यासाठी महान व्यक्तीनी वापरलेल्या9 पध्‍दती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


महान लोकांच्या जीवनावरून धडा घेऊन आपणही आपले जीवन सुरळीत आणि व्यवस्थित करू शकतो. हे लोक इतरांपेक्षा वेगळे काम करतात. त्यांच्या पद्धती सर्वसामान्यांना माहीत असतील, पण याच पद्धती वापरून ते कामावर कसे लक्ष केंद्रित करू शकले याविषयी जाणून घेऊया..

जास्त वेळ काम न करणे
आजकाल ऑ फिसमध्ये जास्त वेळ काम करण्याला ‘प्रेझेंटिझम’ असे म्हटले जाते. पण आठ तासांपेक्षा जास्त वेळ काम करणारे इतिहासात खूप कमी लोक होते. मायकल फोकॉल्ट हे तत्त्वज्ञानी सकाळी नऊ वाजेपासून तीन वाजेपर्यंत काम करत होते. संगीतकार बिथोवन सूर्योदयापासून दुपारी तीन वाजेपर्यंत काम करत असत. टॉ रॉबिन्स हे लेखकसुद्धा तीन तासांपेक्षा जास्त वेळ लिखाण करत नसत.
कामादरम्यान विश्रांती

हे महान लोक दिवसभर काम करताना ब्रेक घेत होते. सुकरात हे तत्त्वज्ञानी काम सोडून सात मिनिटे उभे राहत असत. बिथोवन थोडा वेळ धावत असत किंवा फिरून येत असत. ते आपल्या कामाला ‘वर्किंग व्हाइल वॉकिंग’ असे म्हणत असत. म्हणजे काम करता करता पायी चालणे.
दुपारी आराम

मेंदूला आराम मिळण्यासाठी आणि सृजनशीलता टिकवून ठेवण्यासाठी अनेक जण जास्तीत जास्त वेळ कामापासून दूर राहत असत. बिथोवन सकाळी काम सुरू करत होते, पण दुपारपर्यंत ते संपवत होते. व्हिक्टर ह्युगो सकाळी लिखाण करत असत आणि दिवसभर काम करत नसत. दुपारभर पॅरिसच्या रस्त्यांवर डबल डेकर बसमधून फिरत असत.
शांततेत जेवण करणे

चर्चिल जेवण अगदी निवांतपणे करत असत. आजकालसारखे अपल्या डेस्कवर बसून सँडविच खाल्ल्याप्रमाणे जेवण नव्हते. असे लोक शांततेने जेवण करत असत. घरात एकट्याने किंवा दूरवर एखाद्या उद्यानात बसून आरामात जेवणाचा आस्वाद घेत असत.
दिवसभरात अनेक कामे

यशस्वी लोक दिवसभरात अनेक कामे करत असत. जर्मन तत्त्ववेत्ते इमॅन्युअल कांट दुपारी पायी चालत असत. दररोज आपल्या मित्रांसोबत जेवण करत असत. गांधीजी चरखा चालवत आणि रात्री उशिरा स्नान करत असत. चर्चिल पेंटिंग करत असत, माशांना दाणे देत असत आणि पत्त्यांचा बंगला तयार करत असत. आपल्या मेंदूला आरामापेक्षा विविध प्रकारची कामे हवी असतात, असे त्यांचे मत होते.
मिनिटांचा हिशेब नको

यशस्वी लोकांची दिनचर्या पाहिली असता असे लक्षात येते की, प्रत्येक मिनिटाचा हिशेब ठेवणे आवश्यक नसते. प्रत्येक मिनिटाचा हिशेब ठेवून आपण दिनचर्या कठीण करतो.
रिलॅक्स म्हणजे काय ?
अनेकदा रिलॅक्स होण्यासाठी बरेच जण एखाद्या कमी अवघड कामात गुंतवून घेतात. पुस्तक वाचणे किंवा भांडी घासणे हे रिलॅक्सेशन नाही. गांधीजी शांत राहून निसर्गाचे निरीक्षण करत असत. चर्चिल एकटे बसून सिगारेट पीत असत. बिथोवन नेहमी आत्मपरीक्षण करत असत.
लवकर उठणे गरजेचे?

हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. गांधी, फ्रँकलिन आणि मंडेला लवकर उठत असत, तर सॅम्युअल जॉन्सन, चर्चिल आणि डायलन थॉमस उशिरा उठत असत. असे लवकर उठो किंवा उशिरा, त्यांच्याकडे एकांतात रमण्यासाठी, स्वत:साठी बराच वेळ होता.
व्यायाम आवश्यक

इमर्सन, गांधी, व्हिक्टर ह्युगो हे नियमित पायी चालत. जर्मन तत्त्ववेत्ते नित्शे म्हणत की, सकाळी पाच वाजता व्यायाम करताना त्यांना रचनात्मक विचार सुचत. नेल्सन मंडेलादेखील दररोज सकाळी पाच वाजता पायी फेरफटका मारायला जात. एकदा तर मंडेलांनी एका पत्रकाराला मुलाखतीसाठी सकाळी पाच वाजेची वेळ दिली होती, पण त्या पत्रकाराला मंडेलांच्या वेगाने चालता आले नाही. तो एवढा थकला की, काहीच प्रश्न विचारू शकला नाही.


lifedev.net