आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज यात्रेकरुंना मास्क लावून या, सौदी अरेबियाची सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियाध - हज यात्रेक रूंना मास्क लावून येण्याचे आदेश सौदी अरेबिया सरकारने दिले आहेत. देशातील कोणत्याही धर्मस्थळास भेट देताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.


आरोग्य मंत्रालयाने इतर धर्मस्थळांना भेट देण्यासाठीही खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.हज यात्रा ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे परंतु अनेक भाविक रमजान महिन्यात सौदीत येतात. मंत्रालयाने म्हटले आहे की, अरेबियात गेल्या सप्टेंबरपासून मार्स (मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) कोरोनव्हायरसचा संसर्ग झाला आहे. यामध्ये सर्वसाधारण खोकला आणि सार्सचेही विषाणू आहेत. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी सौदीत येऊ नये, असा सल्ला सरकारने दिला आहे. आतापर्यंत 44 लोक या आजाराला बळी पडले आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. सन 2003 मध्ये सौदी सरकारने पोलिओ लसीचे प्रमाणपत्र आणण्याचा सल्ला यात्रेकरूं ना दिला होता.