आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्सिडीजची ही मॉन्स्‍टर एसयूव्ही तुम्हाला चालवायला आवडेल ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मर्सिडीजने नवी मॉन्स्टर एसयूव्ही एनर-जी-फोर्स लाँच केली आहे. जुन्या जी व्हॅगनच्या चेसिसवरच या गाडीचा टफ लूक तयार करण्यात आला आहे. एनर-जी-फोर्ससारख्या डिझाइनच्या तीन वेगवेगळ्या एसयूव्ही बनवण्याची कंपनीची योजना आहे. या एसयूव्हीला टफ लूक देण्याचा हेतू यामागे आहे. एका अँगलमधून ती हमरसारखी दिसू शकते.

मर्सिडीजने हायवे ‘पेट्रोल व्हेइकल 2012’ काँटेस्टसाठी इनर-जी-फोर्स तयार केली होती. एसयूव्हीचा आकार निश्चितच भव्य आहे, पण भव्य डिझाइन हेच तिचे एकमेव वैशिष्ट्य नाही. इनर-जी-फोर्स हायड्रोजन पॉवर्ड इलेक्ट्रिक मोटारवर चालते. हायड्रोजन पॉवर असल्यामुळे या गाडीच्या छतावरील कंटेनरमध्ये पाणी भरलेले असेल . त्यातून हायड्रोटेक कन्व्हर्टर इलेक्ट्रिसिटी पुरवली जाईल. ही वीज बॅटरीमध्ये सेव्ह केली जाईल. कारची रेंज 800 किलोमीटर असेल. गाडीमध्ये लावलेले 360 डिग्री टोपोग्राफी स्कॅनर (टेरा स्कॅन) गाडीची जी क्लास क्षमता अनेक पटींनी वाढवते.
cartoq.com