आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांकडून मला मृत्यूची ऑफर मिळाली होती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनचे महान संशोधक स्टीफन हॉकिंग यांना ऐंशीच्या दशकात डॉक्टरांनी व्याधीग्रस्त आयुष्य जगण्यापेक्षा मृत्यू हवा आहे का, अशी ऑफर दिली होती. व्याधीमुळे कठीण जीवन जगताना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या काळातच ते ‘अ ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाइम ’ हे क्रांतिकारक पुस्तक लिहीत होते.


पुस्तक लेखनाचे काम सुरू असताना 71 वर्षीय हॉकिंग यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांची स्थिती पाहून डॉक्टरांनी हॉकिंग यांच्या पत्नी जेन यांना जीवनरक्षक प्रणाली काढून टाकण्याचा सल्ला दिला. त्यांच्या छातीला संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्या यातना दूर करण्याची ही एक संधी आहे, असे डॉक्टरांनी सांगितले होते.
त्यांच्यावर स्वित्झर्लंडमध्ये उपचार सुरू होते. जेन-स्टीफन यांचा वीस वर्षांचा संसार केला होता. या कठीण प्रसंगी त्यांचा संसार संकटात सापडला होता. परंतु जेन यांनी धीराने परिस्थिती हाताळली. दोघांची पहिली भेट केम्ब्रिज विद्यापाठीत विद्यार्थिदशेत झाली होती. तरुणपणीच्या काळातच त्यांना विचित्र आजाराची लक्षणे दिसून आली होती.
माहितीपटात हॉकिंग यांच्या बालपणापासूनचे जीवन रेखाटण्यात आले आहे. ते दररोज मृत्यूच्या जवळ असल्याचा अनुभव कसा घेतात. अशा अनेक नवीन गोष्टी त्यातून समोर येतात. ‘माझ्या शोधांपेक्षा लोक मला व्हीलचेअरवरील माणूस म्हणून अधिक ओळखतात, ’ अशी त्यांची वेदनाही माहितीपटातून अधिक गडदपणे समोर येते.


त्या वेळी दिलेला नकार महत्त्वाचा ठरला
तो प्रसंग अतिशय गंभीर होता. ते कोमात गेल्यामुळे पूर्ववत होण्याची शक्यता कमी असल्याने जीवनरक्षक प्रणाली काढून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परंतु मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला व त्यांना केम्ब्रिजला घेऊन जाण्याचे ठरवले. हा नकार महत्वाचा ठरला.’’ जेन हॉकिंग, (स्टीफन हॉकिंग यांच्या पत्नी)


पाच दशकांपासून व्याधी
भौतिकशास्त्रात अतुलनीय शोधाबद्दल हॉकिंग यांना अनेक पुरस्कार मिळाले. गेल्या पाच दशकांपासून ते मोटर न्यूरॉन या आजाराने ग्रस्त आहेत. या आजारात त्यांच्या शरीरातील सर्व अवयवांच्या हालचाली बंद झाल्या आहेत. पन्नास वर्षांपासून याच अवस्थेत त्यांचे जीवन आणि संशोधन कार्य अव्याहतपणे सुरू आहे. वास्तविक हा आजार झाल्यानंतर सामान्य व्यक्ती पाच वर्षांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही.