आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर विसरले गर्भाशयात चिमटा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - गाव-खेड्यात शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये घडली. त्यात एका तरुणीच्या गर्भाशयात चिमटा विसरल्याची घटना उघडकीस आली.
ही घटना सहा आठवड्यांपूर्वीची आहे. तेव्हापासून सदर तरुणीच्या शरीरात हा चिमटा असून त्यामुळे तिला प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत. मूळ फ्रान्सच्या महिलेची सिझेरियनद्वारे यशस्वी प्रसूती झाली होती. त्यानंतर ती आनंदात घरी परतली होती; परंतु काही दिवसांतच तिला वेदना जाणवण्यास सुरुवात झाली. सहा आठवड्यांहून अधिक काळ झाल्यानंतर वेदनेचा कडेलोट झाल्याने त्यापासून मुक्तता व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर गेल्या आठवड्यात तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया झाली. त्यात तिच्या शरीरातून हा चिमटा काढण्यात आला.