आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालकाच्या मृत्यूनंतरही श्वानाची चर्चभेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम - माणसाच्या प्रामाणिकपणाच्या कथा आपण नेहमीच ऐकतो. मात्र ही गोष्ट इटलीतील टॉमी नावाच्या कुत्र्याची आहे. त्याच्या मालकिणीचा मृत्यू दोन महिन्यांपूर्वी झाला. ब्रिंडीसी येथील छोट्या चर्चमध्ये तो रोज जातो. दुपारची घंटा झाल्याबरोबर त्या दिशेने जातो. येथे त्याच्या मालकाची कबर आहे. मालकाच्या मृत्यूनंतर तो नित्यनेमाने या चर्चला भेट देतो. त्याची ही कृती इटलीतील मीडियात चर्चेचा विषय ठरली आहे. हा 12 वर्षीय कुत्रा र्जमन शेफर्ड प्रजातीचा आहे. त्या टॉमीसोबत एकट्याच रहात होत्या.