आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांचे लग्न, खर्च फक्त 87 लाख रुपये!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- सर्वसाधारण लग्नात होते तशीच धांदल. नटून थटून आलेली वर्‍हाडी मंडळी. उच्चभ्रू श्रीमंताच्या लग्नात असतो अगदी तसाच सर्व जामानिमा! लग्नाचा खर्च तब्बल 158187. 26 डॉलर्स म्हणजेच सुमारे 87 लाख रुपये! ब्लॅक ग्रे काठाच्या पांढर्‍या शुभ्र वेडिंग गाऊनमध्ये नटलेली वधू आणि केस कापलेला काळ्या कोटातला वर यांच्या लग्नाचा बार धूमधडाक्यात उडाला. वधूवरांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि जगातील सर्वात महागडे लग्न म्हणून या नाट्यमय लग्नाची गिनिज बुकात नोंद झाली. ही कथा आहे वधू बेबी होप डायमंड आणि वर चिली पास्टरनॅक या नवविवाहित कुत्र्यांच्या जोडप्याची!
कशासाठी लावले लग्न?- न्यूयॉर्कमधील ह्युमन सोसायटीमार्फत राबवण्यात येत असलेल्या मानवी कल्याणाच्या योजनांसाठी निधी गोळा करण्यासाठी बेबी होप डायमंड आणि चिली पास्टरनॅक या कुत्र्याच्या जोडीचे लग्न लावण्यात आले. लग्नाला येणार्‍या पाहुण्यांसाठी तिकीट आकारण्यात आले होते. महागड्या तिकीट विक्रीतून गोळा झालेली रक्कम आणि पाहुण्यांकडून आलेल्या महागड्या भेटवस्तू ह्युमन सोसायटीला दान करण्यात आल्या आहेत.
पाहुण्यांची रेलचेल- या लग्नसमारंभामध्ये थोडीशीही उणीव राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. विद्युत रोषणाई, म्युझिक बँड आणि विविध प्रजातींच्या पाहुणे मंडळींसाठी खास पेट फूट बफेची सोय करण्यात आली होती.
300- सेलिब्रिटीजबरोबर बेबी होपने छायाचित्रे काढली आहेत. प्रसिद्ध व्यक्तींबरोबर सर्वाधिक छायाचित्रे काढलेला प्राणी म्हणून बेबी होपच्या जागतिक विक्रमाची नोंदही गिनीज बुकात झालेली आहे. अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्टपासून ते हीप हॉप स्टार स्नूप डॉगबरोबर तिने पोज दिल्या आहेत.