आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकावं ते नवलच: साक्षीदाराच्या पिंज-यात कुत्र्याने नोंदवली साक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - मालकिणीच्या खून खटल्यात संशयित आरोपीची ओळख पटवण्यासाठी चक्क एका कुत्र्यालाच साक्षीदाराच्या पिंज-यात उभे करण्यात आले आणि फ्रान्सच्या न्यायालयाने त्याची साक्षही नोंदवून घेतली. माणसाचा सर्वात प्रामाणिक आणि विश्वासू मित्र म्हणून कुत्रा ओळखला जातो. मध्य फ्रान्समधील टूर येथील न्यायालयात लॅब्रेडॉर प्रजातीच्या नऊवर्षीय टँगो नावाच्या या कुत्र्याला मालकिणीच्या हत्या प्रकरणातील संशयिताची ओळख पटण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आले.

टँगो अनेक वर्षांपासून मालकिणीकडे राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या मालकिणीची हत्या झाल्याचे उघड झाले होते. या खटल्याच्या सुनावणीत संशयितांची ओळख पटण्यासाठी टँगोला साक्षीदाराच्या पिंज-यात उभे करण्यात आले. टँगो संशयिताला पाहताच जोरजोरात भुंकू लागला.