आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्याने मालकावर गोळी झाडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- कुत्रा हा माणसाचा चांगला मित्र समजला जातो. मात्र, या घटनेत तसे म्हणता येणार नाही. मालक पिकअप ट्रक चालवत असताना त्याच्या कुत्र्याकडून पिस्तुलाचा चाप ओढला गेल्याने गोळी मालकाच्या पायाला लागल्याची घटना फ्लोरिडा राज्यात घडली आहे. ग्रेगोरी डेल लेनियर या ट्रकचालक शनिवारी रेस्टॉरंट सोडल्यानंतर दोन मैल अंतरावर लेनियरने एक मोठा आवाज ऐकला. लेनियरच्या डाव्या पायाच्या पोटरीत गोळी घुसली. हे लक्षात येताच चालकाने गाडी थांबवून आपत्कालीन सेवेशी संपर्क साधला. दरम्यान, पिस्तुलामध्ये गोळी नसल्याचा ट्रकचालक दावा करत आहे. मात्र, पिस्तुलात गोळ्या होत्या या मतावर पोलिस ठाम आहेत.