आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dolphins 10 Times Stronger Than Fittest Human Athletes

अ‍ॅथलिट्सपेक्षा 10 पट जास्त ताकद असते डॉल्फीन्समध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रे यांच्या सिद्धांतानुसार डॉल्फिन मास्यांमध्ये पुरेशी ताकद नसल्याने ते पोहण्यासाठी प्रवाहाच्या नियमाचा वापर करतात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार डॉलेफिन मासे हे मानवी अथलेट्सपेक्षा 10 पटीने जास्त शक्तीमान असतात, असे सिद्ध झाले आहे. ब्रिटीश जीवशात्रज्ञ जेम्स ग्रे यांच्या सिद्धांताच्या 60 वर्षानंतर, वेस्ट चेस्टर या अमेरिकन विद्यापिठातील फ्रॅंक फिश या शास्त्रज्ञाने या विषयावर संशोधन केले आहे.

डॉल्फिनमध्ये किती ताकद असते हे शोधण्यासाठी फिश यांनी हायड्रोडायनामिक्स मॉडेलचा वापर केला. त्यात डॉल्फिन खुप जास्त ताकद निर्माण करू शकतात हे त्यांच्या लक्षात आले.

हे फक्त लिखीत स्वरूपात खरे असले तरी ते प्रयोगाने सिद्ध करणे गरजेचे होते. त्यासाठी मासे पाण्यावर किती फोर्स निर्माण करतात हे मोजणे गरजेचे होते. हे मोजण्यासाठी व्हॅलोसिमेटरी नावाची पद्धत वापरली जाते. पण या पद्धतीने डॉल्फिनची ताकद मोजल्यास त्यात चुका होत असल्याचे आढळून येत होते.

त्यानंतर फिश तिमोथाय यांना एका कॉन्फरन्समध्ये भेटलो. ऑलिंपिकदरम्यान त्यांनाही ही समस्या आली होती. तेव्हा त्यांनी अ‍ॅथलिटसना सुक्ष्म बुडबुडे असणा-या जाळीतून पोहण्याची विनंती केली.


हिच पद्धत आपल्या प्रिमो आणि पिका या डॉल्फिन माशांवर वापरुन पाहण्याचे फिश यांनी ठरवले. त्यांचे जूने मित्र असणारे टेरी विलियम्स यांच्याशी संपर्क केला.

त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापिठाच्या स्कुबा टॅंकमध्ये फिश यांनी त्या माशांना ठेवले. 'हे माशे जेव्हा या टॅंकमध्ये पोहत होते तेव्हा तेथील पाण्याचा पंप मागे फेकला गेला. आम्हाला त्याच क्षणी डॉल्फिनच्या ताकदीचा अंदाज आला.

जेव्हा आम्ही या डॉल्फिननी पाण्यावर तयार केलेली ताकद मोजली तेव्हा ती 549w होती'. असे फिश सांगतात. ही ताकद एका सायकलस्वाराने एक तास सायकल चालवल्यानंतर तयार होणा-या ताकदीच्या 1.4 पट ऐवढी आहे. त्यामुळे डॉल्फिनमध्ये माणसांपेक्षा जास्त मसल ताकद असते हे सिद्ध होते कारण डॉल्फिन्स पोहताना माणसांपेक्षाही जास्त ताकद निर्माण होते.