आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केनिया : अल शबाबने केले बसचे अपहरण, नंतर 28 गैर मुस्लिमांना घातल्या गोळ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नैरोबी - अल शबाबच्या दहशतवाद्यांनी केनियामध्ये एका प्रवाशी बसचे अपहरण केले आणि त्यातील गैर मुस्लिम 28 प्रवाशांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नैरोबीकडे येणारी बस दहशतवाद्यांनी शहरापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर मंदेरा गावानजीक अडवली. त्यानंतर त्यांनी बसमधील गैर मुस्लिम प्रवाशांना खाली उतरवले आणि गोळ्या घालून त्यांची हत्या केली. पोलिस प्रमुखांनी या घटनेसंबंधीची माहिती माध्यमांना देण्यास बंदी घातली आहे.
सोमालियामध्ये ऑक्टोबर 2011मध्ये सैनिक पाठविल्यापासून केनिया दहशतवादी अल शबाब या दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर आले आहे. यामुळे देशात विविध ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोटांच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिस अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, अल शबाबने 2011 पासून आतापर्यंत केनियामध्ये 135 दहशतवादी हल्ले झाले आहेत. यात वेस्ट गेट मॉलचाही समावेश आहे. वेस्ट गेट मॉल हल्ल्यात 60 हून अधिक लोक मारले गेले होते. अल शबाब ही अल कायदाशी संबंधीत दहशतवादी संघटना असल्याचे मानले जाते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत छायाचित्रे..