आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dozens Suspended In Harvard University Cheating Scandal

हार्वर्ड विद्यापीठात कॉपी घोटाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - परीक्षेत कॉपी करणा-या 60 हून अधिक विद्यार्थ्यांवर हार्वर्ड विद्यापीठाने कडक कारवाई केली आहे. त्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून बाहेर राहावे लागणार आहे. गेल्या वर्षी आयव्ही लीग इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या परीक्षेचे हे प्रकरण आहे.
इंट्रॉडक्शन टू काँग्रेस अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यातील 279 विद्यार्थी नोंदणीकृत होते, अशी माहिती मायकल स्मिथ यांनी दिली. प्रशासकीय मंडळाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन 125 प्रकरणांची सुनावणी घेतली आहे. कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आता दोन ते चार सेमिस्टरपर्यंत बाहेर राहावे लागणार आहे.