लंडन - १९२० मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडन येथील निवासाची इमारत ताब्यात घेण्यासाठी फेडरेशन ऑफ आंबेडकराइट अँड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन (एफएबीओ) प्रयत्न करत आहे.४० कोटी रुपयांत हे निवासस्थान विकत घेण्यात येणार आहे. या ठिकाणी सामाजिक न्यायासाठी लढा देणा-या आंबेडकरांचे स्मारक विकसित करण्याचा मानस आहे.
लंडन येथील किंग हेन्री रोडवरील २ हजार ५० स्क्वेअर फुटाची ही मालमत्ता सध्या विक्रीस असून एफएबीओने महाराष्ट्र शासनाकडे निधीची मागणी केली होती. यास शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे एफएबीओच्या अध्यक्षा संतोष दास यांनी सांिगतले.
अद्याप शासकीय औपचारिकता पूर्ण झाल्या नसल्याचे दास यांनी सांिगतले. या संेटरद्वारे गरीब िवद्यार्थ्यांना लंडनमध्ये उच्चशिक्षणाची संधी देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल.