आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्जेरियाचे ओलिस नाट्य संपले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्जियर्स- अल्जेरियात चार दिवसांपासून सुरू असलेल्या ओलिस नाट्यावर रविवारी पडदा पडला. अल-कायदाच्या 11 दहशतवाद्यांचा लष्करी कारवाईत खात्मा करण्यात यश आले, परंतु हल्लेखोरांनी सात जणांची हत्या केली. या घटनाक्रमात अनेक परदेशी कर्मचारी बेपत्ता असल्याचेही वृत्त आहे.

अल्जेरियाकडून करण्यात आलेल्या लष्कराच्या अंतिम कारवाईत त्यांच्या जवानांनी गॅस प्रकल्पावर हल्लाबोल केला होता. प्रकल्पामध्येच ओलिस नाट्य सुरू होते. लष्करी कारवाई सुरू असतानाच हल्लेखोरांनी ओलिस ठेवलेल्या सात परदेशी नागरिकांची हत्या केली. चार दिवसांपासून सुरू असलेल्या ओलिस नाट्यात 23 हल्लेखोर आणि 32 ओलिसांचा मृत्यू झ्ाांला. ओलिसांमधील काही नागरिकांचा अद्याप ओळखदेखील पटू शकलेली नाही. ओलिसांच्या सुटकेसाठी निर्णायक कारवाई सुरू असताना कट्टरवादी नेता अब्दुल रहमान अल-निजेरी सरकारला धमकी दिली होती. ओलिस नागरिकांना मृत्यूसाठी सोडून देणे, अशी ती धमकी होती. लष्करी कारवाई करण्यात आली तर गॅस प्रकल्प उडवून दिला जाईल, अशी धमकी देण्यात आली होती.
बेपत्ता नागरिक
आमच्या सहा नागरिकांची हत्या झाली असावी किंवा त्यांची काहीही माहिती मिळत नसावी, असे ब्रिटनने म्हटले आहे. अमेरिका, फ्रान्सकडूनही प्रत्येकी एका नागरिकाच्या मृत्यूस दुजोरा देण्यात आला आहे. जपान, नॉर्वे, कोलंबियानेदेखील आपल्या नागरिकाच्या मृत्यूची शक्यता वर्तवली आहे. या हल्ल्यात अगोदरच आमचा एक नागरिक मारला गेला आहे. इतर पाच जणांच्या बाबतीत आम्ही साशंक आहोत, असे ब्रिटनने म्हटले आहे. फ्रान्सने मात्र अल्जेरियाच्या कारवाईला पाठिंबा दिला.
फ्रान्सच्या हल्ल्याचा बदला
मालीमध्ये इस्लामी समुदायाविरुद्धच्या फ्रान्सच्या लष्कराचा हल्ल्याचा सूड म्हणून अल्जेरियात हा हल्ला करण्यात आल्याचे हल्लेखोरांनी म्हटले होते.
नेमकी घटना काय ?
अल-कायदाच्या अतिरेक्यानी बहुतेक सर्व लोकांना ओलिस ठेवले होते. त्यात 573 अल्जेरिया आणि 132 परदेशी होते. त्यातील 100 जणांची सुखरूप सुटका करून घेण्यात यश आले होते, परंतु सात ओलिस त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा हल्लेखोरांनी केला होता. 30 परदेशी नागरिकांवरून संभ्रम निर्माण झाला होता. त्यात 10 ब्रिटनचे नागरिक होते.