आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dream: Google Made Easy Visa Process Between India Pak

गुगलने केल्या भारत-पाकमधील सुलभ व्हिसा प्रक्रियेच्या आशा पल्लवित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - गुगलने प्रसिद्ध केलेल्या ताज्या जाहिरातीत भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर पहिल्यांदाच भेटल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांच्या भेटीची ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या चारच मिनिटांत पार पडल्याचे दर्शवणा-या या जाहिरातीने भारत-पाकिस्तानमधील व्हिसा प्रक्रिया सहजसोपी होण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत, परंतु वस्तुस्थिती मात्र त्याहून खूपच भिन्न आहे.
उभय देशांनी परस्परांवर अत्यंत कडक निर्बंध लादल्यामुळे सीमा भागात राहणा-या असंख्य लोकांसाठी तरी हे दिवास्वप्नच ठरले आहे. दोन्ही देशांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आगमनानंतर व्हिसासारख्या उदार व्हिसा धोरणाच्या दिशेने पावले टाकली असली तरी सामान्य माणसाला व्हिसा मिळणे अद्याप तरी दुरापास्तच आहे. पाकिस्तान सरकारचे माजी कर्मचारी 98 वर्षीय सरदार मोहंमद हबीब खान यांचेच उदाहरण घेऊ. मूळचे पाकव्याप्त काश्मीरचे असलेले सरदार खान यांनी चाळीसच्या दशकात जम्मू-काश्मीर राज्यात श्रीनगर आणि बारामुल्लामध्ये वन अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी या शहरांना भेटी देण्यासाठी व्हिसाकरिता तब्बल तीन वेळा अर्ज केला. मात्र तो त्यांना मिळाला नाही.
‘डेहराडूनमध्ये मला वन अधिका-याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या शहराच्या स्मृती अजूनही माझ्या मनात ताज्या आहेत, पण आता वयाच्या 98 व्या वर्षी वार्धक्यामुळे प्रवास करणे अशक्य होऊन बसले आहे,’, असे सरदार खान सांगतात. सरदार खान यांचा मुलगाच आता 60 वर्षांचा आहे.
पाकिस्तानी मूळ असलेल्या भारतीय नागरिकांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. ते ज्या शहरात जन्माला आले आहेत तेथे भेट देण्याची त्यांची अनिवार इच्छा ते बोलून दाखवतात. मात्र ते काही केल्या शक्य होत नाही.मी जगभराचा प्रवास करू शकतो. मात्र कोणी तरी माझी हमी घेतल्याशिवाय मी लाहोरला भेट देऊ शकत नाही. आता मी पाकिस्तानमध्ये कोणालाही ओळखत नाही तरीही तेथे भेट देण्याची माझी इच्छा आहे, असे फाळणीच्या वेळी भारतात स्थलांतरित झालेले 87 वर्षीय विशद्र धवल सांगतात. पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अशरफ जे. ओझी सुलभ व्हिसा धोरणाचा जोरकसपणे पुरस्कार करतात. लोका-लोकांमधील संपर्क आवश्यक आहे अन्यथा आम्ही अज्ञानीच राहू. उद्योगपती, विद्यार्थी, पत्रकार आणि इलाइट वर्गाला उभय देशांना भेटी देता येतात. त्याचप्रमाणे सर्वच समाज घटकातील लोकांनाही भेटी देता यायला हव्यात, असा ओझी यांचा आग्रह आहे.
भावनिक नाते अद्यापही अतूट
फाळणीच्या इतक्या वर्षांनंतरही भावनिक नाते अतूट राहिलेले आहे. त्यामुळे फाळणीपूर्वी माझे कुटुंबीय राहत होते. त्या नानकसाहिबला भेट देण्याचे माझे स्वप्न आहे. गुगलची जाहिरात सर्व अधिका-यांनी पाहिली असावी आणि त्यांना आता तरी वस्तुस्थिती उमगली असावी.
-अमृता सोधी, दिल्ली
सोशल मीडियावर जोरदार प्रसंशा
थेट भावनेला हात घालणा-या गुगलच्या या जाहिरातीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून दोन्ही देशांच्या सीमा भागातील नागरिक या जाहिरातीचे तोंडभर कौतुक करत आहेत आणि दोन्ही देशांच्या सरकारांच्या हृदयाला आता तरी पाझर फुटेल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.