आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्लोरिडातील दलदलीत स्वप्नाती महाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपलं घर म्हणजे प्रत्येकासाठी एक स्वप्न असते. हावर्ड सोलोमन या मूर्तिकारानेही आगळ्यावेगळ्या घराचे स्वप्न पाहिले होते, आणि अतिशय मेहनतीने ते पूर्ण केले. 78 वर्षांच्या हावर्ड यांनी 12 हजार चौरस फुटात तीन मजली महाल स्वत:च्या हाताने बांधला आहे. या महालात 90 काचेच्या खिडक्या, पाच बेडरुम आणि चार बाथरुम आहेत.


हावर्ड 1972 मध्ये न्यूयॉर्कहून फ्लोरिडाला गेले होते. तेथे त्यांनी काही जमीन खरेदी केली आणि पत्नी व मुलांसठी पाच मुलांसाठी घर बांधले. त्या ठिकाणी त्याला पारंपरिक घर बांधायचे होते, मात्र त्यांनी घेतलेली जागा दलदलीची असल्याचे कळले तेव्हा त्यांना धक्का बसला. पण परिस्थितीवर हार न मानता संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन नुकसान टाळण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे घर बांधायचे ठरवले. हे घर बांधण्यासाठी 12 वर्षे लागली. त्यानंतर चार वर्षांनी त्यांनी दरीत एक जहाज तयार केले आहे. या नौकेला त्यांनी 250 व्यक्तींसाठीच्या रेस्टॉरंटचा आकार दिला आहे. तिला ‘बोट इन ए मोट’ असे नाव दिले आहे. त्यांचे हे घर एवढे लोकप्रिय झाले आहे की, सामान्य लोकांना पाहण्यासाठी ते दररोज उघडले जाते. तेथील रेस्टॉरंटमध्ये ग्राहक येथेच्च भोजन करतात. त्यांनतर घराच्या पूर्वेकडील टॉवरमध्ये 6,400 रुपये भाडे देऊन एक रात्र राहू शकतात. या महालातून मिळणार्‍या उत्पन्नावर हावर्ड यांनी त्यांच्या नातीचे लग्नही अगदी परिकथांमधील थाटात लावून दिले. आता शाही लग्नसमारंभांसाठीदेखील या महालाचा उपयोग केला जात आहे. 21 व्या वर्षी लष्करातील नोकरी सोडून त्यांनी हे घर बांधायला सुरुवात केली असे हावर्ड सांगतात. हे घर बांधण्यासाठीचे कौशल्य स्वत: विकसित केल्याचे हावर्ड सांगतात.


B youtube.com